थोडक्यात
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाष्य केलं
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुंबईसह या अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज"
(Sanjay Raut) संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुंबईसह या अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सामान्य माणूस आपल्या प्रतिनिधी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेत पाठवतो. स्थानिक स्वराज्य संस्था या सत्तेचं विकेंद्रीकरण करणाऱ्या संस्था आहेत. महाराष्ट्रात या स्थानिक स्वराज्य संस्थांना फार महत्त्व आहे त्यांना ताकद आहे."
" अशावेळेला त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेप्रमाणेच मतदार याद्या आणि एकंदरीत यंत्रणेमध्ये होणार असेल तर त्या निवडणुकींना काही अर्थ नाही. म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ जेव्हा भेटले मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना जे केंद्राच्या, निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत. त्यांना निवेदन दिलं. स्वत: काही निर्णय घेतलं नाही आणि केंद्राकडे पाठवून दिलं. मग राज्यात तुम्हाला कशाकरता नेमलं आहे? सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. पण ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक याद्यामधलं जे दोष आहेत. ते दुरुस्त करावेत."
यासोबतच ते पुढे म्हणाले की, "तुम्ही 5-6 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत. मग 2-4 महिने मागेपुढे झाले तर काय बिघडलं. निवडणूक याद्या या निर्दोष असायला पाहिजे त्याशिवाय निवडणूक घेणं ही लोकशाहीची थट्टा होईल. ही भूमिका आम्ही मांडली. त्या भूमिकेसंदर्भातलं निवेदन दिलं. महाराष्ट्रातलं प्रमुख अधिकारी निर्णय घेऊ शकत नाहीत. आता काय करायचं? विचारतात ही शोकांतिका आहे. काय करायचे म्हणजे निवडणूक याद्या दुरूस्त करा. हे तुमच्या हातात आहे ना. जी बोगस नावे आहेत ती डिलिट करा. ज्यांची नावे मोठ्या प्रमाणात वगळली आहेत ती समाविष्ट करा." असे संजय राऊत म्हणाले.