शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या विधानावरून वादाचा सामना रंगू लागला आहे. उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या टिकेनंतर आता राज्याचे ग्रामविकासमंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघातानं मिळालं. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिलं. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते.असं म्हणत राऊत यांनी अनिल देशमुखांना खडेबोल सुनावले होते.
दरम्यान या प्रकरावर हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त करत, त्यांची भावना चांगली असेल मात्र राज्यात तीन पक्षांचे आघाडीचे सरकार सत्तेत असल्याने त्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.