Sanjay Raut 
महाराष्ट्र

Sanjay Raut : "देशात एवढं बोगस मतदान कधी झालं नव्हतं"; निवडणूक आयोगाच्या भेटीपूर्वी संजय राऊतांचा घणाघात

मविआ, मनसे आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मविआ, मनसे आज घेणार निवडणूक आयोगाची भेट

  • "देशात एवढं बोगस मतदान कधी झालं नव्हतं"

  • "मुख्य निवडणूक आयुक्तांची आज भेट घेणार"

( Sanjay Raut) मविआ, मनसे आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे,शरद पवार, राज ठाकरेंसह सर्व प्रमुख नेते आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर या भेटीला महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयोगाला भेटेल. दुसरे एक शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांना भेटेल.ती तयारी आता सुरु आहे. या देशातल्या निवडणुका गेल्या 10 वर्षापासून फ्रॉड झालेलं आहे. महाराष्ट्रमध्ये आम्ही हा अनुभव घेतला, हरियाणामध्ये काँग्रेसनं अनुभव घेतला."

" लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ 40 ते 45 जागा चोरण्यात आल्या नाही तर भारतीय जनता पक्षाचे सरकार या देशात आले नसते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी सरासरी साडेतीन ते चार लाख मतं बोगस आहेत. हे लोक दोन दोन- तीन तीन ठिकाणी मतदान करतात. अशावेळेला निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे काम करावे. ही आमची भूमिका आहे."

यासोबतच ते पुढे म्हणाले की, "अनेक विषय आहेत जे आम्हाला निवडणूक आयोगासमोर मांडाव्या लागणार आहेत. त्यासाठी आज सगळे प्रमुख लोक एकत्र येऊन निवडणूक आयोगासोबत चर्चा करु. त्यांना आम्ही दाखवू तुम्ही निवडणुकांचा कसा खेळ आणि जोक केलाय. मत येतात कशी? वाढतात कशी? कोण पडद्यामागे हालचाल करतंय, इतकं बोगस मतदान या देशात यापूर्वी कधी झालं नव्हते." असे संजय राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा