थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Uddhav Thackeray - Raj Thackeray ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
यातच अनेक दिवस राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधू यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली. यातच आता मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यात काही जागांवरून रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक बैठका घेण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभांचं नियोजन सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 2 जानेवारीनंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या राज्यातील महापालिकांमध्ये संयुक्त सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले असून 2 जानेवारीपासून 11 दिवसांत सहा ते सात महापालिकांमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे संयुक्त सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे, मीरा-भाईंदर या ठिकाणी संयुक्त सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभांच नियोजन सुरू
2 जानेवारीनंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या राज्यातील महापालिकांमध्ये संयुक्त सभा घेण्याचे नियोजन
मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे, मीरा-भाईंदर या ठिकाणी संयुक्त सभा घेणार