महाराष्ट्र

माती सम्राटांची महसूल प्रशासनाच्याच डोळ्यात धूळ

Published by : Lokshahi News

अरविंद जाधव. सातारा, पाटण

सध्या पाटण तालुक्यात मातीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. जरी रॉयल्टी भरली जात असली तरी प्रत्यक्षात उत्खनन ३-४ पटीने केले जाते हा मातीसम्राट यांचा मात्र वेगळा कायदा. आज पर्यावरण पूरक नियम राखत उत्खनन करण्याची परवानगी दिली जाते. तसेच खोदकाम याची देखील मर्यादा घालून दिली आहे. परंतु प्रत्यक्षात खोदकाम १० -१५ फूट केले जात आहे. यामुळे दोन पैशाचे लालच देत शेतकरी यांचे भविष्यातील मोठे नुकसान केले जाते. यामुळे शेजारील शेतकरी यांना पूराच्या पाण्यात आपली जमिन डोळ्यादेखत वाहताना पाहत बसावे लागते. मूळात लाल हलकी भुसकट माती ही सम्राटांचे लक्ष असते त्यामुळे पूरात हेक्टर शेती इतर शेतकरी यांची वाहली जाते. हे सर्व महसूल नियमांनुसार दिवसाढवळ्या सुरु आहे परंतू याबाबत कोणीच अधिकारी काही कारवाई करताना दिसत नाही उलट एक रॉयल्टी संपली की दुसरीसाठी सम्राट येण्याची वाट पाहत असतात. त्यामुळे इतर नुकसानग्रसत शेजारील शेतकरी जरी तक्रार करायला गेले तरी तक्रार याच अधिकारी यांच्याकडे करावी लागत असल्याने अधिकारीच गप्प असल्याने स्वतः गप्प बसल्याशिवाय पर्याय नसतो.

पाटणच्या नदिकाठावर सध्या स्थानिकांसह कराड तालुक्यातील माती सम्राटांचा मोठा डोळा आहे. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धा पहावयास मिळतात. परंतु यात माती विक्रेता शेतकरी याचा काहीच फायदा होत नाही. सकाळपासून माती सम्राट विटभट्टी निर्माता यांना माती पोहच करण्यास सुरुवात करतात काहीजण अति सकाळी असतात. एका दिवसाला अमूक उतख्ननाची अट असताना देखील वाढीव गाड्या भरुन पाठवल्या जातात. मागील तहसीलदार योगेश टोम्पे यांनी अशा अवैध वाहतुकीस चांगलाच दणका देत सम्राटांचे धाबे दणाणले होते. परंतु माती उतख्नन सुरु होऊन अद्याप एकही कारवाई झाली नाही याबाबत सध्या आश्चर्य व्यक्त केले जाते. जर का कोणी अधिकारी माती उतख्नन ठिकाणी गेले तर सम्राटांना महसूल कायदा काय असतो ? हे दाखवू शकतो परंतु न येण्याची व्यवस्था करण्यात या माती सम्राटांचा हात कोणीच धरू शकत नाही.

पाटणच्या नदिकाठावर सध्या स्थानिकांसह कराड तालुक्यातील माती सम्राटांचा मोठा डोळा आहे. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धा पहावयास मिळतात. परंतु यात माती विक्रेता शेतकरी याचा काहीच फायदा होत नाही. सकाळपासून माती सम्राट विटभट्टी निर्माता यांना माती पोहच करण्यास सुरुवात करतात काहीजण अति सकाळी असतात. एका दिवसाला अमूक उतख्ननाची अट असताना देखील वाढीव गाड्या भरुन पाठवल्या जातात. मागील तहसीलदार योगेश टोम्पे यांनी अशा अवैध वाहतुकीस चांगलाच दणका देत सम्राटांचे धाबे दणाणले होते. परंतु माती उतख्नन सुरु होऊन अद्याप एकही कारवाई झाली नाही याबाबत सध्या आश्चर्य व्यक्त केले जाते. जर का कोणी अधिकारी माती उतख्नन ठिकाणी गेले तर सम्राटांना महसूल कायदा काय असतो ? हे दाखवू शकतो परंतु न येण्याची व्यवस्था करण्यात या माती सम्राटांचा हात कोणीच धरू शकत नाही.

आता राहिला तो रस्ते वाहतूक विभागाचा प्रश्न. गाडीत भरलेली माती व प्रत्यक्षात वाहनाचा वाहतूक परवाना विसंगत असताना देखील काही कारवाई होत नाही. लाल माती अपूर्ण झाकून तसेच वर अती भरणीचा उंचवटा नागरिकांना दिसतो परंतू वाहतूक विभागास दिसत नाही याचे ही आश्चर्य वाटते. प्रचंड वेगात वाहतूक असा एक नियम या माती सम्राटांनी ठरवून घेतला आहे. एक फेरी झाली की दुसरी साठी धाव. दररोज अशा माती वाहतूक गाड्यंच्या शेकडो फेऱ्या होत असताना अधिकाऱ्यांची एकही फेरी रस्त्यावर नसते ही गांधारीची भूमिका देखील कारवाई न होण्यामागचे कारण असू शकते.

या माती सम्राट यांचे जेसीबी व वाहन चालक यांना खाणीत असताना एखाद्या परदेशातील हिल साईड रायडिंग वाहन स्पर्धा यांचा प्रत्यक्ष आनंद मिळतो. काही ठिकाणी तर खाणीतून अचानक-भयानक गाडीचे तोंड काढणे अनेकांना नशीब बलत्तर असल्याची साक्ष देते. जेसीबी चालकांची तर यात प्रमुख भूमिका असते. साधारण नदीकाठाची माती या सम्राटांचे लक्ष असते त्यामुळे जरी नियम ५० फूट पात्रापासून दुर असताना देखील नदीपात्राशेजारी दुसरे नदीपात्र तयार करण्यात निसर्गाला देखील हे पाठी टाकतात.

शेतीसाठी सर्वत्र नदीशेजारी पाणी मोटरी असतात. त्यास विज पुरवठा करण्यासाठी विजेचे खांब ठराविक अशा अंतरावर जोडले असतात. अशा वेळी विद्युतखांबांचे अगदी कोरीव काम पाहिले की आंबा खाल्याची आठवण येते. ज्या पाटण तालुक्यात मोठ्या वादळात भक्कम जागेतील खांब आडवे होतात तिथे हे खांब बघताना आता पडतो की काय ? अशी चिंता वाटावी अशा परिस्थितीत खांब रामभरोसे ठेवतात. परंतु माती कणभर ही न सोडण्याच्या मालकाचा हुकूमाचा तंतोतंत पालन करतात अश्या इमानदारीसाठी त्यांना देखील एखादा पुरस्कार मिळाला पाहिजे. या ही पेक्षा महावितरणची तत्परता कमालीची शेतकरी यांना शेतीपंप जोडण्यासाठी या खाबांची गरज असताना महीने महिने पायऱ्या झिजवाव्या लागतात परंतु माती सम्राटांचे काम फत्ते झाले की काही तासाभरात त्या खांबास नवजीवन देताना महावितरण कडून नाही पण या माती सम्राटांकडून नक्कीच बक्षीस मिळत असेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा