शशिकांत सूर्यवंशी, कराड
साताऱ्यातील घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कराड, पाटण महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोयना नदी दुथडी भरून वाहत असून कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग 42 हजार 100 क्युसेकवरून वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्गात वाढ करण्याची शक्यता आहे. 24 तासांमध्ये धरण क्षेत्रात कोयना 92 मिलिमीटर, नवजा 158 मिलिमीटर, महाबळेश्वर 101 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.