शशिकांत सूर्यवंशी, सातारा
साताऱ्यात कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून सध्या कोयना धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक ही 45168 क्युसेकने सुरु असून धरण 85.81 टीएमसी झाल्याची माहिती मिळत आहे.
कोयना धरण परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून पावसाची संततधार कायम आहे. 42100 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीमध्ये सोडण्यात आलेले आहे.
पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर कोयना धरणातून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचं धरण प्रशासनाकडून सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.