महाराष्ट्र

पावसाने खचलेल्या करुळ-भुईबावडा घाटाची सतेज पाटलांकडून पाहाणी

Published by : Lokshahi News

सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा दौऱ्यावर असलेले पालकमंत्री सतेज पाटील यांनी भुईबावडा घाट येथे पाहणी केली. अतिवृष्टीमुळे घाटातील दरड कोसळण्याची घटना घडत आहे. तर घाट रस्ता देखील खचला आहे. यामुळे भुईबावडा घाटातून तळ कोकणाकडे जाणारी वाहतूक बंद आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

रस्ता खचण्याच्या घटना घडत असल्याने, रस्त्याच्या बाजूने सुरक्षा कठडे काँक्रिटिकरण करण्याबरोबरच या ठिकाणचे रस्ते काँक्रिटिकरण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अतिवृष्टीने रस्ते खचत असल्याने, पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी त्याचा मास्टर प्लॅन तयार करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी