Sadhguru gets a rousing welcome in India
Sadhguru gets a rousing welcome in India Team Lokshahi
महाराष्ट्र

Save Soil : मोटरसायकलवर 26 राष्ट्रांना भेट देऊन सद्गुरु भारतात पोहोचले

Published by : Team Lokshahi

कडाक्याची थंडी आणि प्रचंड उष्णतेतून प्रवास करत, त्यांच्या माती वाचवा (save soil) मोहिमेला बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाने निळ्या आणि हिरव्या रंगांच्या रोशनाईने माती वाचवा पाठिंबा दर्शवला आहे. प्रवासाला (#JourneyForSoil) युरोप, मध्य आशिया आणि मिडल ईस्ट मध्ये जबरदस्त यश मिळाल्यानंतर ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरूंनी (sadhguru jv) आज गुजरातमधील जामनगर बंदरावर उतरून भारतीय मातीवर पाऊल ठेवले. ओमानमधील सुलतान काबूस बंदरातून निघून आणि तीन दिवसात हिंदी महासागर ओलांडून सद्गुरू आज भारताच्या पश्चिम किनार्यावर पोहोचले. भारतीय नौदलाच्या बँडने सद्गुरूंचे स्वागत माती वाचवा मोहिमेचे गाणे वाजवून केले, तसेच उपस्तिथ लोकांच्या समूहाने जल्लोषात सेव सॉईल थिम सौंग वाजवून, ‘धरती की पुकार, धरती की ललकार, धरती की दहाड, माती बचाओ, पेड लगाओ’ असा नारा देत केले. सद्गुरूंनी ह्या प्रसंगी एक रोप लावले, जे 'माती वाचवा' च्या भारतातील प्रवासाची सुरुवात दर्शवते.

विविध राज्यांतून हजारोंच्या संख्येने उपस्तित लोकांना त्यांच्या ढोल-ताशे, विलक्षण संगीत सादरीकरण आणि हाय व्होल्टेज घोषणांनंतर, सद्गुरूंनी 'माती वाचवा' मोहिमेची गती सुरू ठेवण्यास सांगितले. “फक्त आजचा एक दिवस नाही, तर कमीत कमी पुढचे 30 दिवस तुमचा आवाज असाच गजबजलेला ठेवा. जो पर्यंत जगातील प्रत्येक सरकार असे घोषित करत नाही की त्यांनीही मातीचे पुनरुज्जीवन करण्याचे धोरण बनवले आहे, तो पर्यंत दररोज 15-20 मिनिटे सतत हा संदेश देत राहा.” आपण सर्वांकडे जो मोबाइल फोन आहे ते एक शक्तिशाली साधन आहे, याचा वापर करून मातीबद्दल बोलण्यासाठी प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर करा, असे आवाहन त्यांनी केले. "जेव्हा तुमच्याकडे अशी शक्ती आहे, तेव्हा आपण हे घडवून आणलेच पाहिजे," असे ते म्हणाले.

जामनगरच्या जामसाहेबांच्या प्रतिनिधी एकताबा सोढा यांनी बंदरावर सद्गुरूंचे स्वागत केले. या कार्यक्रमात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कमांडिंग अधिकाऱ्यांसह धार्मिक आणि राजकीय नेते सुद्धा सामील झाले होते. या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग बनणे हे आपले सौभाग्य असल्याचे त्यांनी व्यक्त केले. सद्गुरूंबद्दल त्या म्हणाल्या, “ते धोरणात्मक बदलांवर प्रभाव टाकत आहेत, ते शिक्षण देत आहेत, माती वाचवण्याबद्दल जागरुकता निर्माण करत आहेत आणि हे खूप महत्वाचे आहे की शाही कुटुंबाच्या निमंत्रणावर जामनगरच्या इतिहासात आज दुसरी वेळ आहे जेव्हा कार्गो पोर्टवर एक नागरिक उतरत आहे." त्यांच्यासोबत टगबोटवर आलेल्या त्यांच्या मोटारसायकलकडे जात सद्गुरुंनी कलाकारांची प्रशंसा केली. शेकडो सेव्ह सॉईल स्वयंसेवकांच्या नागमोडी लाइनअपमधून बंदरातून मोटारसायकलवर पुढे जात सद्गुरूंनी त्यांच्या गर्जना स्वीकारल्या.

कमांडिंग ऑफिसर आणि वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नेव्ही बँडने त्यांचे संगीतमय स्वागत केले. मनापासून आभार व्यक्त करत आपला भारतातील प्रवास सुरू ठेवण्यासाठी सद्गुरू बंदरातून बाहेर पडले. या मार्चमध्ये माती वाचवण्याची जागतिक मोहीम सुरू केल्यानंतर सद्गुरू सध्या १०० दिवसांच्या, ३०,००० किमी ‘माती वाचवा प्रवासावर’ (#JourneyForSoil) आहेत. 21 मार्च रोजी लंडनमध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला आणि जूनच्या अखेरीस कावेरी नदीच्या खोऱ्यात तो संपेल. माती वाचवा मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट जगातील सर्व राष्ट्रांना तातडीच्या धोरणात्मक सुधारणांद्वारे शेतजमिनीत किमान 3-6% सेंद्रिय सामग्री अनिवार्य करण्यासाठी प्रेरित करणे आहे. मृदा शास्त्रज्ञांनी या किमान सेंद्रिय सामग्रीशिवाय मातीच्या विनाशाचा इशारा दिला आहे, ज्याला ते ‘मातीचे नामशेष होणे’ म्हणून संबोधत आहेत.

भारतामध्ये, शेतजमिनिवारच्या मातीत सरासरी सेंद्रिय सामग्री 0.68% असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे देशाला वाळवंटीकरण आणि माती नष्ट होण्याचा मोठा धोका आहे. देशातील सुमारे 30% सुपीक माती आधीच नापीक बनली आहे आणि उत्पादन देण्यास असमर्थ आहे. असा अंदाज आहे की, जागतिक स्तरावर सुमारे 25% सुपीक जमीन ओसाड झाली आहे. युनायटेड नेशन्सने चेतावणी दिली आहे की सध्याच्या मातीच्या ऱ्हासाच्या दरानुसार आतापासून तीन दशकांपेक्षा कमी काळात - 2050 पर्यंत पृथ्वीचा 90% भाग वाळवंटात बदलू शकतो. माती नष्ट झाल्यामुळे जगभरात अभूतपूर्व पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक आपत्ती येऊ शकतात. यामध्ये तीव्र होणारे हवामान बदल, जागतिक अन्न आणि पाण्याची टंचाई, भीषण नागरी संघर्ष आणि प्रत्येक राष्ट्राची सुरक्षा आणि सांस्कृतिक रचना धोक्यात आणणाऱ्या स्थलांतरचा समावेश आहे.

युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन (UNCCD), युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP), यूएन वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) द्वारे माती वाचवा मोहमेला पाठिंबा आहे. सद्गुरूंनी ६८ दिवसांपूर्वी आपला प्रवास सुरू केल्यापासून, जगभरातील ७४ राष्ट्रांनी आपापल्या देशांतील माती वाचवण्यासाठी ठोस कृती करण्याचे वचन दिले आहे.

conscious planet isha

कॉन्शियस प्लॅनेट:

माती वाचवा, ही माती आणि ही धरती वाचविण्यासाठी एक सजग दृष्टीकोणाची प्रेरणा देणारी जागतिक चळवळ आहे. ही पहिली आणि अग्रगण्य अशी लोक चळवळ आहे. जगातील ३.५ अब्ज लोकांचा पाठींबा मिळवून (जगात मतदानाचा अधिकार असणाऱ्या ६०% लोकसंख्येपेक्षा जास्त) जगभरातल्या शासनांना मातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मातीचा ऱ्हास थांबवण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. जागतिक नेते, प्रभावशाली व्यक्ती, कलाकार, शेतकरी, तज्ञ, आध्यात्मिक नेते, NGOs आणि सामान्य जनता, हे पुढे येऊन माती सोबत मानवतेचा संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी या मोहिमेला पाठींबा देत आहेत.

"२० तारखेला निवडणूक होऊद्या, २१ तारखेला मिटिंग लावतो आणि..."; नाशिकच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Carrom: कॅरम खेळल्याने होतात हे शारीरिक फायदे! जाणून घ्या...

Chess: बुद्धिबळ खेळण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या...

भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं केली निवृत्तीची घोषणा; BCCI ने शेअर केली 'ही' खास पोस्ट

Rubik's Cube: तुम्हाला रुबिक्स क्यूब खेळायची सवय आहे का? तर मग हे वाचाच...