महाराष्ट्र

SBI बँक कर्मचाऱ्याची शेतकऱ्याला मारहाण

Published by : Lokshahi News

आई वडिलांसोबत बँकेत पीक कर्ज मागण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याला एसबीआय बँक कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. भोकरदन तालुक्यातील गव्हाण संगमेश्वर गावातील तरुण शेतकरी आपल्या आई वडीलांसोबत बँकेत आला होता. बँकेचे चॅनल गेट मधून पीककर्जा बाबद विचारणा करताच, एसबीआय बँक कर्मचारी असलेल्या पाठण यांनी तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली, इतक्यावरच न थांबताभर चौकात आणून शेतकऱ्याला मारहाण केली.

घटनेची माहिती मिळताच शिवसेना शहर प्रमुख महेश पुरोहित यांनी या घटनेचा निषेध करत शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची निलंबन करण्याची मागणी करत पोलिसात धाव घेतली आहे. या कर्मचाऱ्यावर कारवाई ची मागणी जोर धरू लागली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा