थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Kolhapur School ) कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा 5 डिसेंबरला बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 'टीईटी' आणि संचमान्यतेचा १५ मार्च २०२४ चा आदेश रद्द करावा, यासह अन्य मागण्यांसाठी येत्या पाच डिसेंबरला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे बंद आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केलं आहे.
'टीईटी' विरोधात 5 डिसेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा बंद राहणार आहेत. कोल्हापुरात मोर्चाचेही आयोजन करण्यात आले असून शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध उच्च माध्यमिक, माध्यमिक, प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक पार पडली असून या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं असे आवाहन करण्यात आलं आहे.
Summery
5 डिसेंबरला कोल्हापुरातील शाळा राहणार बंद
'टीईटी' विरोधात शाळा बंद
संचमान्यता आदेश 2024 च्या रद्दच्या मागणीसाठी कोल्हापुरात मोर्चाचं आयोजन