यंदा महाराष्ट्रात 12 दिवस आधीच मान्सुन ला सुरुवात झाली आहे. तसेच येत्या काही दिवसांत समुद्रात वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यत हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र शासनाकडून 1 ते 31 जुलैपर्यंत मासेमारीसाठी शासकीय बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी 31 जुलैपर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी केली असता किव्हा नियमांचे उल्लंघन केले तर मत्स्यविभागाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.
1 जून ते 31 जुलै पर्यंत मासेमारीला बंदी
मत्स्य व्यवसाय कोकण किनारपट्टीवरील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय आहे. त्यांच्या आर्थिक उत्पादनाचे मुख्य साधन आहे.मोठ्या समुद्रकिनाऱ्यामुळे मासेमारीचा व्यवसाय हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. मात्र यंदा 1 जुन ते 31 जुलै पर्यंत हे आर्थिक उत्पन्न बंद असणार आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेशाद्वारे यंदा दि.1 जून ते 31 जुलै 2025 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) समुद्रातील खोल मासेमारीला बंदी असणार आहे. या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या जल क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी आणि स्वयंचलित नौकांना खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालावधीत स्वयंचलित व यांत्रिकी अश्या कोणत्या हि नौकांद्वारे खोल समुद्रात मासेमारी केली जाणार नाही.
या कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने सांगितले आहे. त्यामुळे मच्छिमारांना खोल समुद्रात मच्छिमारी न करता आपल्या बोटी किनाऱ्यावर दाखल करण्याच्या सूचना मत्स्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. असे असताना किनारी भागात बिना यांत्रिक बोटीमधून काळजी घेऊन पारंपरिक मासेमारी करण्यास मात्र परवानगी देण्यात आली आहे.
माश्यांचा प्रजनन काळ आणि मत्स्यनिर्मिती
साधारण जून-जुलै महिन्यांचा काळ हा माशांच्या प्रजनन काळ असतो. या काळात अनेक प्रजाती प्रजनन अवस्थेत असतात. त्यामुळे माशांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी ही बंदी अत्यावश्यक मानली जाते. त्यामुळे मत्स्यनिर्मिती ही मोठ्या प्रमाणावर होते. या दोन महिन्यांच्या मासेमारी बंदी मुळे समुद्रात येणाऱ्या वादळी लाटांपासून तर मच्चीमारांचे संरक्षण तर होतेच मात्र त्याचबरोबर माश्यांची संख्या ही ह्या काळात वाढते. यामुळे मासे आणि इतर सागरी जीवांचे संवर्धन होण्यास मदत होते.
मासे खवय्यांच्या खिशाला कात्री
1 जुन ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत मासेमारी बंद असल्यामुळे बाजारात माश्यांची आवक कमी होणार आहे. परिणामी माश्यांचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. या काळात मासेमारी बंदीमुळे बाजारात माशांचा पुरवठा कमी होतो.त्यामुळे परिणामी मासे खवय्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागण्याची शक्यता आहे. परिणामी नदीकिनारी मिळणाऱ्या गोड्या पाण्यातील माश्यांची मागणी वाढणार आहे.