थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sharad Pawar - Ajit Pawar ) महापालिका निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. यातच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती.
याबाबत अनेक बैठका देखील पार पडल्या. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचं जागा वाटप ठरलं असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार 125 तर शरद पवार यांचा पक्ष 40 जागावर लढणार आहे. मतांची विभागणी होऊ नये यासाठी राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला असून 40 जागांवर तुतारी चिन्हावर लढणार असल्याची माहिती मिळत आहे.
काल रात्री उशिरा दोन्ही पक्षातील नेत्यांची अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. आज सकाळी पुन्हा अंकुश काकडे हे अजित पवार यांच्या भेटीला गेले असून काहीच वेळात दोन्ही पक्षातील उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले जाणार आहेत.
Summery
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचं जागावाटप ठरलं
अजित पवार १२५ तर शरद पवार यांचा पक्ष ४० जागावर लढणार
मतांची विभागणी होऊ नये यासाठी राष्ट्रवादीचा निर्णय