बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून् 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
जागावाटपासंदर्भात अनेक बैठका होत आहेत. याच पार्श्वभूमीवर वर्षा निवास स्थानी जागा वाटपाबाबत काल रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. यातच नाशिकमध्ये देखील अद्याप महायुतीत ठरत नसल्याचे पाहायला मिळत असून
आज पुन्हा गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 45 जागांवर शिवसेना ठाम असून सन्मानपूर्वक जागा न भेटल्यास स्वतंत्रपणे लढण्याची देखील शिवसेनेची तयारी असल्याची माहिती मिळत आहे. आज सकारात्मक चर्चा न झाल्यास स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आजच्या या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Summary
नाशिकमध्ये अद्याप महायुतीत जागावाटप ठरेना
गिरीश महाजन,दादा भुसेंमध्ये आज चर्चेची शक्यता
45 जागांवर शिवसेना ठाम