(Maharashtra Assembly Monsoon Session) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून18 जुलैपर्यंत असणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत असून विधिमंडळ अधिवेशनात विरोधक अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्षाला घेराव घालण्याच्या तयारीत आहेत. विरोधक दुसऱ्या आठवड्यात पुन्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि नुकसान भरपाईच्या मुद्यावर आक्रमक होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सौर कृषिपंपाबाबत येणाऱ्या अडचणींकडे विरोधक सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधतील. तसेच मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारती, ड्रग्ज याबाबत विरोधक सरकारचं लक्ष वेधणार आहेत.