महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात कलम 144 लागू

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप, सातारा | त्रिपुरा राज्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात 17 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आला आहे. जिल्हादंडाधिकारी यांनी हा आदेश लागू केला असून पाच पेक्षा अधिक नागरीकांना जमण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा, शासकीय बैठका, शासकीय कार्यक्रम व पोलीस विभागाकडून परवानगी घेऊन करीत असलेले कार्यक्रम यांना वगळून या कालावधीत खालील कृत्ये करण्यास प्रतिबंधत्मक आदेश लागू केले आहेत. पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोकांनी जमाव जमवुन सभा घेणे, मोर्चा काढणे. धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी महाआरती, नमाज पठण तसेच इतर धार्मिक विधी करणे, एकत्र येवून घोषणाबाजी, जल्लोष याबाबी सार्वजनिक ठिकाणी करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉटसॲप, ट्वीटर, फेसबूक इत्यादी समाज माध्यमांचा वापर करुन जातीय तणाव निर्माण करणाऱ्या अफवा, आक्षेपार्ह संदेश पसरविणे. अशा प्रकारच्या अफवा, आक्षेपार्ह मजकुराचा संदेश पसरविणार नाही, शेअर करणार नाही किंवा याटाकणार नाहीत बाबत सर्वस्वी जबाबदारी ग्रुप ॲडमीनची राहील. कोणत्याही प्रकारचे जातीय तणाव निर्माण करणारे मजकुराचे देखावे तसेच फ्लेक्स बोर्ड लावणे त्या प्रकारच्या प्रक्षोभक घोषणा देणे, पत्रके वाटणे. समाज माध्यमामध्ये चुकीची माहिती, अफवा जाणीवपूर्वक प्रसारीत अथवा प्रकाशित करणे इत्यादी गोष्टीस या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना दागिने खरेदी करण्यासाठी उत्तम योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Asia Cup 2025 IND vs PAK Live Update : बुम-बुम बुमराहची कमाल अन् दुसरी विकेट, मोहम्मद हरिस 3 रनसह बाद

Asia Cup 2025 IND vs PAK : टॉस जिंकला म्हणजे सामना जिंकला! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी दुबईच्या मैदानाचे गूढ जाणून घ्या