मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण शहरात शांतता राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे आदेश जारी करण्यात आले आहेत. 20 डिसेंबर मध्य रात्री ते 18 जानेवारी 2024 पर्यंत ही जमाबंदी लागू असणार आहे.
जमावबंदीच्या काळात अनेक गोष्टींवर बंदी करण्यात आली आहे. मुंबईत १८ जानेवारीपर्यंत लाऊड स्पीकर, वाद्ये आणि बँड वाजवण्यास तसेच फटाके फोडण्यास बंदी असणार आहे. कलम १४४ लागू करण्यात आल्याने ५ किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल. जमाबंदीच्या काळात सभा तसेच आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच यादरम्यान मुंबईत कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यास बंदी असेल. मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यासही बंदी घालण्यात आली असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे मुंबई पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.