महाराष्ट्र

आर्यन खानला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा; राज्यमंत्री रामदास आठवलेंचा शाहरुख खानला सल्ला

Published by : Lokshahi News

आर्यन खान प्रकरणावरुन सध्या नवीनवीन वाद निर्माण होत आहे. अशातच आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी समीर वानखेडे यांना पाठिंबा दिला आहे आणि वानखेडेंनी काहीही चुकीचे केले नसल्याचे म्हटले आहे.

यासोबतच आठवले यांनी शाहरुख खानला एक सल्ला देखील दिला आहे की, आर्यन खानला एका महिन्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात पाठवावे.

वानखेडे यांना पाठिंबा देताना रामदास आठवले म्हणाले की, आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पाठीशी उभी राहील. वानखेडे यांच्यावरील आरोप निराधार आणि खोडसाळ आहेत. आणि " मी शाहरुख खानला विनंती करतो की आर्यन खानने सुधारणा करावी.त्याला एक-दोन महिने व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करावे, असा माझा सल्ला आहे. असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाने घेतली शरद पवार यांची भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा