थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
(Omkar Elephant ) गेल्या अनेक दिवसांपासून ओंकार हत्ती चर्चेत आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूरमध्ये ओंकार हत्तीने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. ओंकार हत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
हत्तीमुळे शेतीचे नुकसान होत असून यामुळे शेतकरी , नागरिक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर ओंकार हत्तीबाबत प्रा. रोहित कांबळे यांनी सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली होती.
या प्रकरणी आता आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्याच्या सीमेवरील 'ओंकार' हत्तीला तात्पुरते गुजरातमधील 'वनतारा' सेंटरमध्ये पाठवा. तसेच, उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करून पुढील कार्यवाही करा, असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचच्या डिव्हिजनल बेंचने दिले. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित कडेठणकर यांनी हा निकाल दिला.
Summery
सिंधुदुर्ग, कोल्हापुरात ओंकार हत्तीचा धुमाकूळ
'ओंकार' हत्तीला 'वनतारा'मध्ये पाठवा
कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश