महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकरांचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध; शरद पवार पक्षाचे प्रवक्ते राहुल मखरे यांचा आरोप

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आणि दाऊद यांची भेट झाल्याचा खळबळजळक आरोप केला होता

Published by : shweta walge

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आणि दाऊद यांची भेट झाल्याचा खळबळजळक आरोप केला होता यानंतर आता इंदापुरातून शरद पवार गटाचे नेते ऍड. राहुल मखरे यांनी आंबेडकरांवर निशाणा साधलाय, प्रकाश आंबेडकर आणि देवेंद्र फडवणीस यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि याचे व्हिडिओ पुरावे आमच्याकडे आहेत असा गंभीर आरोप मखरे यांनी प्रकाश आंबेडकरांवर केलाय.

यावेळी मखरे यांनी केवळ पवार साहेबांना बदनाम करण्यासाठी पवार साहेब आणि दाऊद भेट ओढून ताणून आणण्याचा काम केवळ राजकीय फायद्यासाठी प्रकाश आंबेडकर करीत असून, 3 जानेवारीला जो महाराष्ट्रात बंद पुकारला होता, तो बंद देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा करूनच पुकारला होता अशी प्रकाश आंबेडकरांनी कबुली दिलेला व्हिडिओ देखील माझ्याकडे असल्याचा खळबळजनक आरोप राहुल मखरे यांनी प्रकाश आंबेडकरांवर केलाय.

तसेच प्रकाश आंबेडकर हे भाजपची बी टीम असून ते देवेंद्र फडवणीस यांना सहकार्य करण्यासाठी काम करीत असून,त्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे मात्र जर पवार साहेबांबद्दल त्यांनी अशी वक्तव्य केली तर ती आम्ही सहन करणार नाही असा इशारा देखील राहुल मखरे यांनी दिलाय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Chamoli Nandanagar cloudburst : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ढगफुटी; 5 जण बेपत्ता

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर