Molestation Team Lokshahi
महाराष्ट्र

भंडारा जिल्ह्यातील ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

नराधमांवर कडक शिक्षा व्हावी; डॉ.नीलम गोऱ्हेंची मागणी

Published by : Team Lokshahi

भंडारा : जिल्ह्यात येथील घरगुती वादातून एकटीच माहेरी जाणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणात दोन जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित महिलेला या अत्याचारामुळे तीव्र जखमी व प्रचंड रक्तस्राव होत होता. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणासारखी ही घटना असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित महिलेचा कुंटुंबिंयासोबत प्रकृतीची विचारपूस करून धीर दिला, न्याय मिळण्याकरीता आम्ही सर्वोपरीने कायदेशीर आम्ही मदत करणार, अशी ग्वाही दिली. विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेनेच्या उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांना वृत्तवाहिन्याचा माध्यमातून आलेल्या बातमीनुसार व त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार पूर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख व विभागीय प्रवक्ता शिल्पा बोडखे व शिवसेना महिला आघाडी नागपूर महिला पदाधिकारी समवेत जाऊन भेट घेतली.

नागपूर मेडीकल कॉलेजचे डीन डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी दुरध्वनी संपर्क माध्यमातून पीडित महिलेची प्रकृतीची विचारणा केली. तिच्या सर्व उपचारासाठी शासकिय स्तरावर सर्व काळजी घेतली जाईल अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. तसेच भंडारा जिल्हा पोलीस अधिक्षक (का) अनिकेत भारती यांनीही या घटनेबद्दल अधिक गतीने तपास करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या