महाराष्ट्र

sexual Harassment | विद्यार्थ्यांनीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाची पुण्यात निघाली धिंड

Published by : Lokshahi News

गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनी कडे वारंवार शरीरसुखाची मागणी करणाऱ्या एका शिक्षकाची पुण्यातील रस्त्यावरून तोंडाला काळे फासत धिंड काढण्यात आली. अभिजित पवार असे या शिक्षकाचे नाव आहे. पुण्यातील एका महाविद्यालयापासून ते विश्रामबाग पोलीस ठाण्यापर्यंत या शिक्षकाला मारहाण करत धिंड काढण्यात आली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पिडीत तरुणी ही पुण्याच्या मध्यवस्तीतील एका महाविद्यालयात बारावीला शिक्षण घेते. मागील काही दिवसांपासून संबंधित शिक्षक या तरुणीकडे गुण वाढवून देण्याच्या आमिषाने शरीर सुखाची मागणी करत होता. परंतु संबंधित तरुणीने त्याला वारंवार नकार दिला होता. तरीदेखील या शिक्षकाचा जाच सुरू होता. अखेरीस या तरुणीने संबंधित शिक्षकाचा फोन कॉल रेकॉर्ड केला आणि घरच्यांना दाखवला. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास संबंधित तरुणीच्या नातेवाईक आणि इतर काही व्यक्तींनी महाविद्यालयात जाऊन संबंधित शिक्षकाला जाब विचारला. तर काहींनी त्याच्या तोंडावर शाई टाकत मारहाणही केली. त्यानंतर महाविद्यालयापासून ते विश्रामबाग पोलिस ठाण्यापर्यंत या शिक्षकाची धिंड काढण्यात आली. संतप्त झालेल्या जमावाने मारहाण करतच या शिक्षकाला पोलीस ठाण्यात आणले होते. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकाराची माहिती घेत आहेत. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला