महाराष्ट्र

'आमच्या आई बहिणीवर शिव्या द्यायला सुरुवात करतील' शहाजी बापू पाटलांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

राज्याचे राजकरण सध्या अनेक घडोमोडी घडत आहेत. यातच शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published by : shweta walge

राज्याचे राजकरण सध्या अनेक घडोमोडी घडत आहेत. यातच शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते सांगोल्यात माध्यमांशी बोलत होते. सध्या राज्यात अतिशय घाणेरडे राजकारण सध्या विरोधकांनी सुरू केले आहे. शब्दाला कुठेही मर्यादा नाही, फक्त आया बहिणींवर शिव्या देणे शिल्लक ठेवले आहे.अशी टीका त्यांनी केली आहे.

ते म्हणाले की, निवडणूक काळात उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील आमच्या आई बहिणीवर शिव्या द्यायला सुरुवात करतील. त्यासाठी आमच्या आया बहिणींची नावही मागून घ्यायला सुरुवात करतील.

राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार देखील या घाणेरड्या राजकारणात सहभागी झाले आहेत. राजकारण 1952 सालापासून पाहत आले आहे परंतु सर्वात वाईट वातावरण विरोधकांनी सध्या तयार केले आहे. नको तशी भाषा वापरली जाते. टीका करताना शब्दाला कोणतीही मर्यादा राहिलेली नाही. फक्त आया बहिणींवर शिव्या देणे शिल्लक ठेवले आहे. आता तर निवडणूक काळात उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील आमच्या आई बहिणीवर शिव्या द्यायला सुरुवात करतील. त्यासाठी आमच्या आया बहिणींची नावही मागून घेतील आणि म्हणतील आम्हाला शिव्या द्यायच्या आहेत.

तुम्ही सुपाऱ्या दुसऱ्यांच्या गाडीवर टाकल्यावर तुमच्या गाडीवर नारळ पडतीलच. तुम्ही सुपाऱ्या टाकल्यानंतर समोरच्यांनी बघतच बसायचे का? असा सवाल शहाजी बापू पाटलांनी केला आहे. मुळात या राजकारणाची सुरूवताच उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यांनी हे सगळे थांबवावे, असे देखील शहाजी बापू म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा