थोडक्यात
शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक
शक्तीपीठ महामार्गासाठी पर्यायी जागेचा विचार सुरू , मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत
शक्तीपीठ महामार्गात बदल होण्याची शक्यता
(Shaktipeeth Mahamarg ) शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. यावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर भागात शक्तीपीठ महामार्गात बदल होण्याची शक्यता आहे.
पर्यायी जागेचा विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये याबाबत सांगितल्याची माहिती मिळत आहे. शक्तीपीठ महामार्गाला काही भागात विरोध करण्यात आला आहे. यासाठी आंदोलन केलं जाते.
काही जिल्ह्यांमध्ये याला विरोध असल्याने काही प्रमाणात यामध्ये बदल करण्यात येईल. या शक्तीपीठला वाढता विरोध पाहता सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर भागात बदल केले जाऊ शकतात. अशी माहिती मिळत आहे.