Shalini Thackeray  
महाराष्ट्र

Fire Aaji : ‘हातच्या कंकणाला आरसा कशाला’; शालिनी ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published by : left

'मातोश्री'ला पहारा देणाऱ्या 80 वर्षीय फायर आजींची नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सहकुटूंब घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीवर आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय.

शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) ट्विट करत म्हणाल्या आहेत, “फायर आजींची भेट घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आजीने ‘हातच्या कंकणाला आरसा कशाला’ अशी परिस्थिती दाखवून दिली....!!!! असं म्हणत शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

शालिनी ठाकरेंनी (Shalini Thackeray) या ट्विटमध्ये म्हणीद्वारे मुख्यमंत्र्यांना डीवचण्याचा प्रयत्न केला. ‘हातच्या कंकणाला आरसा कशाला’ अशी म्हण लिहत त्यांनी फायर आजींच्या घरच्या परीस्थितीकडे लक्ष वेधले. त्यामुळे या म्हणीचा असाच अर्थ होतो, जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुरावा लागत नाही. तसेच शेवटी कट्टर शिवसैनिक अजूनही हक्काचे घर आणि नोकरीपासून आजही वंचित असल्याची आठवण करून दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा