बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kolhapur ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
जागा वाटपासंदर्भात अनेक बैठका, चर्चा होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरात शरद पवार यांची राष्ट्रवादी मविआशी फारकत घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडी मधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीसोबत फारकत घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आज याबाबत अधिकृत निर्णय होणार आहे. त्यामुळे आता नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
कोल्हापुरात मविआत जागावाटपाचा तिढा
शरद पवारांची राष्ट्रवादी मविआसोबत फारकत घेणार ?
आज अधिकृत निर्णय होणार