थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sharad Pawar) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे.
तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारी रोजी चिन्हाचं वाटप होणार असून 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत अनेक बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.
यातच आता मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून 50 ते 60 जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती मिळत असून 2017 ला झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे ठाकरे बंधू त्यांना 60 जागा सोडणार का ? की शरद पवार पक्ष माघार घेणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून 50 ते 60 जागांची मागणी
2017 ला झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक आले होते निवडून
ठाकरे बंधू त्यांना 60 जागा सोडणार का की शरद पवार पक्षाला माघार घेणार हे बघणे महत्त्वाचे