बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sharad Pawar) आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला मुंबई मनपासाठी प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी हा प्रस्ताव दिला असून सध्या काँग्रेसची वंचित आणि सीपीआयसोबतही चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. यावर अद्याप राष्ट्रवादीने निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे नावीन आघाडी तयार होणार कां हे पाहणं महत्वाचं आहे.
Summary
पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला मुंबई मनपासाठी प्रस्ताव
मंगळवारी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा प्रस्ताव
सध्या कॉग्रेसची वंचित आणि सीपीआयसोबतही चर्चा सुरु