Bhagat Singh koshyari  
महाराष्ट्र

शरद पवारांच्या निवासस्थानावर हल्ला; राज्यपाल कोश्यारी म्हणाले...

Published by : left

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर एसटी कर्मचाऱ्यांनी (St Employee) धडक मोर्चा नेत आंदोलन केले होते. या आंदोलनावरून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी अशा घटना परत व्हायला नको अशी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी (St Employee) धडक मोर्चा नेला. यावेळी शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवासस्थानाच्या दिशेने चपला देखील भिरकावल्या गेल्या होत्या. या घटनेने मोठा हायवोल्टेज ड्रामा घडलेला. तसेच या प्रकरणात 109 संपकरी कर्मचारी (St Employee) व रात्री वकील गुणरत्न सदावर्ते यांना देखील अटक करण्यात आली होती.

याप्रकरणात आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh koshyari) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री हे प्रकरण हाताळत आहेत, आणि स्वतः शरद पवार हे प्रतिष्ठित व्यक्ती आहे. अशा घटना परत व्हायला नको, याची काळजी घ्यायला हवी. यावर राज्य सरकार देखील पुढे लक्ष देईल असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केल. ते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी बोलत होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा