महाराष्ट्र

कोकणच्या सुपुत्राने आफ्रिकेत साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती

Published by : Shweta Shigvan-Kavankar

निसार शेख | चिपळूण : राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहेत. अशातच कोकणच्या सुपुत्राने आफ्रिकेतील टांझानिया येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा केला. व विदेशात देखील छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची प्रथा सुरू केली आहे. त्यांचे संपूर्ण कोकणातून कौतुक केले जात आहे.

चिपळूण येथील माजी नगराध्यक्ष स्वर्गीय लियाकत चौघुले यांचे सुपुत्र शरीक चौघुले हे सध्या आफ्रिका देशातील टांझानिया येथे वास्तव्यास असून ते तेथील नगरसेवक देखील आहेत. कोकणच्या या सुपुत्राने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव मराठी बांधवांना एकत्रित आणून साजरा केला.

आज संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात असतानाच परदेशातही आपले मराठी बांधव आपल्या राजांचा हा उत्सव साजरा करून जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा प्रसार करताना पाहायला मिळत आहेत.

शरीक चौघुले यांनी आफ्रिकेत शिवजयंती उत्सव साजरा केल्याबद्दल गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी अभिनंदन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परदेशात साजरी करणाऱ्या शरीक चौघुले यांचे आता संपूर्ण कोकणातून कौतुक केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत रोड शो; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घेणार राज ठाकरे यांची भेट

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 15 जणांचा मृत्यू

मुंबईतील स्थानिक अधिकाऱ्यांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश

घाटकोपरमध्ये बचावकार्यादरम्यान होर्डिंगचा लोखंडी सांगडा उचलताना पेट्रोल पंपाला आग