महाराष्ट्र

महेश शिंदेंचा राजकारणातील जन्मच पवार साहेबांमुळं…; शशिकांत शिंदेंची जळजळीत टीका

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप, सातारा | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असे विधान आमदार महेश शिंदे यांनी केले होते. या विधानानंतर आता शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांच्यावर टिका करत असताना स्वत:ची उंची पहावी. ज्यांना शिक्षणाबद्दल आणि पवार साहेबांबद्दल माहिती नाही त्यांनी अशी टिका करु नये पवार साहेबांवर टिका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे असा आरोप आमदार महेश शिंदे यांच्यावर केलाय.

कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यात शाब्दिक वाद पेटला आहे. ज्या विषयातली तुम्हाला माहिती नाही त्यावर आपण बोलु नये असं सांगत शरद पवार यांनी ही संस्था चांगली सांभाळली असल्याचं सांगितलय. तसेच या संस्थेचे सर्व संचालक वेगवेगळ्या क्षेत्रातील मात्तबर व्यक्ती आहेत. रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रात विखुरली गेलीये आणि या संस्थेकरीता सर्व क्षेत्रातील जाणकार मात्तब्बर संचालक चांगल काम करताना पहायला मिळतायेत. कोरोना काळात सुद्धा संस्थेला अडचणी येऊ नयेत म्हणुन संस्थेसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी गोळा करुन संस्थेचं काम शरद पवार यांनी थांबु दिलं नाही. ऐवढ मोठं काम शरद पवार साहेब करत असताना महेश शिंदे यांनी असे आरोप करणं योग्य नाही.

तसंच कर्मवीर आण्णांच्या विचारांना मुर्त स्वरुप देण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. स्पर्धेच्या युगात आधुनिक प्रकारची टेक्नाॅलाॅजी वापरुन संस्थेला स्पर्धेत टिकवण्याचं काम शरद पवार करतायेत. शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचा विषय आत्ताच का निघाला या सर्वांच्या पाठीमागे कोण आहे हे बघितलं गेलं पाहीजे.

सर्व शिक्षक आणि संचालकांनी रयतच्या शिक्षणाचा दर्जा राखल्यामुळेच संस्थेत शिक्षण मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालक सतत धडपडत असतात. रयत मधील नोकर भरती वेळी पैसे घेत जात असल्याचा आरोप हा बिनबुडाचा असुन महेश शिंदे यांचे वडील रयत सेवक होते आणि स्वत: सुद्धा त्यांनी याच संस्थेत शिक्षण घेतलं आहे असं ते सांगतायेत मग असं असताना त्यांनी संस्थेला बदनाम करणं याच्या पाठिमागे काय षडयंत्राचा भाग असु शकतो याचा तपास केला पाहिजे असं ही शशिकांत शिंदे म्हणाले.महेश शिंदे यांचा राजकारणातील जन्मच पवार साहेबांमुळं झालाय त्यांनी हे त्यांनी विसरु नये पवारसाहेबांवर टिका करत असताना त्यांनी अनेक वेळा विचार करुनच बोलावं असा इशारा ही शशिकांत शिंदे यांनी दिलाय.

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...