राजन साळवी यांनी पक्षप्रवेशानंतर आज रत्नागिरीमध्ये शिंदे गटाची आभार सभा घेण्यात आली आहे. हा सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, राजन साळवी प्रमुख पाहुणे उपस्थित होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण दिले आहे.
एकनाथ शिंदे तुम्हाला पाण्यात बघताय....
भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांचा अपमान करा पण महादजी शिंदे साहित्यिकांचा अपमान आपण करताय. या साहित्यिकांना तुम्ही दलाल म्हणताय. ज्यांनी तुम्हाला एकेकाळी मुख्यमंत्री केलं... त्यांचाही अपमान आपण करताय. 'जनाची नाय किमान मनाची काय तरी ठेवा' तुम्हाला दिवसा-रात्री स्वप्नात कधी एकनाथ शिंदे दिसत असेल. मोगलांच्या काळात संताजी धनाजी जसा मोगलांच्या घोड्याला दिसायचे. तसे तुम्ही एकनाथ शिंदे तुम्हाला पाण्यात बघताय. पण माझ्यावरती कितीही आरोप करा, कितीही शिव्या परंतु या एकनाथ शिंदेच्या मागे माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी आहेत. तोपर्यंत मला कसलीही चिंता नाही. मी कोणालाही घाबरत नाही".
लोक तुम्हाला का सोडतात याचा विचार करा, शिंदेचा ठाकरेंवर निशाणा
पुढे शिंदे म्हणाले की,"अडीच वर्षापुर्वी पाहिलं या राज्याने, नाही देशाने नाहीतर. जगातल्या ३२ देशांनी त्याची नोंद घेतली. आज इथे सुभाष बने त्याचबरोबर बाळासाहेब जाधव आले. या सर्वांचे स्वागत मगाशीच केले आहे. राजन साळवी देखील यांनी खरं म्हणजे अडीच वर्षापूर्वी यायला पाहिजे होत. योगायोग लागतो. राजन साळवी आणि त्यांचा परिवार देखील शिवसेनेमध्ये आला आणि खऱ्या अर्थाने या कोकणामध्ये एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये का येतात. 'खऱ्या अर्थाने ज्या पक्षाच्या विचाऱ्यांना वाळवी लागली आहे. तिथं कसा राहिल राजन साळवी'. शिवसेनेमध्ये लोक का येत आहेत. मी त्यांचे स्वागत करतोय, परंतु मला शिव्या, आरोप देण्यापेक्षा हे लोक का तुम्हाला सोडतात याचा विचार करा. याचे आत्मपरिक्षण करा. आत्मचिंतन करा".
'शोले' मधला डॉयलॉग मारत शिंदेचा ठाकरेंना टोला
पुढे शिंदे म्हणाले की, "तुम्ही आता लोक घेतले, आम्ही तुमची डोकी फोडू अरे डोकी फोडायला कोण आहे तिकडे हातात मनगटात ताकद लागते जोश लागतो. मला आठवतो शोले मधला डायलॉग आसराणीच्या बोले "आधे इधर जाओ, आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ रामदास कदम पीधे देखेगा तो कोई नही है". कशाला उगाच फुकाच्या माता मारताय".
आरोपाला आरोपाने उत्तर देत नाहीतर, आरोपाला एकनाथ शिंदे कामातून उत्तर देतो- शिंदे
पुढे शिंदे म्हणाले की, 'दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरु झाली विकासाची गाडी' "हे या दाढीने तुम्हाला अडीच वर्षापूर्वी दाखवले कशाला माझ्या नादाला मी कोणाच्या नादाला लागत नाही. मी कुणावरही आरोप करत नाही.. आणि मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही तर आरोपाला एकनाथ शिंदे उत्तर कामातून देत असतो".
कुठलीही योजना बंद होणार नाही.- शिंदे
पुढे शिंदे म्हणाले की, "या राज्याचा विकास आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो. लाडक्या बहिणींची योजना केलीये. इतर योजना केल्या कुठलीही योजना बंद होणार नाही. ही खात्री आपण बाळगा कारण आम्ही खोटी आश्वासन देणार नाही. जे आम्ही बोलणार ते करुन दाखवणार बाळासाहेब म्हणायचे "एखादा शब्द देताना दहा नाही शंभरवेळा विचार करा". आम्ही पुर्ण विचार करुन या योजना सुरू केल्या आहेत. आपण भरभरून मतांचा वर्षाव याठिकाणी तुम्ही केला आहे. उदय सामंत किरण सामंत इथे आहेत. सगळे आमदार आहेत. मंत्रालयात बसून करायचं नाही लोकांमध्ये जाऊन काम करायचे आहे. असे मी उदय सामंताना सांगितले आहे".
घरात बसून राज्य चालवता येतं असं मी नाही म्हणत पवार साहेबांच्या पुस्तकात लिहीलं - शिंदे
पुढे शिंदे म्हणाले की, "घरात बसून राज्य चालवता येतं असं मी नाही म्हणत पवार साहेबांच्या पुस्तकात लिहीलं आहे. घरात बसून पक्ष चालवता येत नाही फेसबुक लाईव्ह करुन पक्ष चालवता येत नाही. राज्य चालवता येत नाही. त्याला फेस टू फेस लोकांमध्ये जावं लागतं. लोकांमध्ये संवाद साधवा लागतो बांधावर जावं लागंत. शेतकऱ्यांना भेटावं लागतं. सर्वसामान्य लोकांच्या अडी-अडचणी समजून घ्याव्या लागतात. हा एकनाथ शिंदे शेतकऱ्यांचा मुलगा सर्वसामान्य परिवारातून आम्ही आलो. ही शिवसेना सर्वांमुळे मोठी केली आहे" असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले आहेत.