Raj Thackeray  team lokshahi
महाराष्ट्र

Warrant against Raj Thackeray : राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाचे वॉरंट

राज ठाकरे कोर्टात हजर राहिल्यास त्यांचे वॉरंट रद्द करण्यात येईल

Published by : Shweta Chavan-Zagade

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात शिराळा कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे. ८ जून रोजी राज ठाकरेंना हजर राहायचे आहे. शिराळा कोर्टाकडून आता हे वॉरंट मुंबई पोलिसांना प्राप्त झालं आहे. राज ठाकरे कोर्टात हजर राहिल्यास त्यांचे वॉरंट रद्द करण्यात येईल अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली आहे. राज ठाकरेंविरोधात शिराळा कोर्टाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. वारंवार कोर्टात गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने वॉरंट जारी केले. (Shirala Court warrant to Raj Thackeray)

2008 मधील सांगलीतील एका प्रकरणाबाबत राज ठाकरे न्यायालयात हजर (Raj Thackeray in Shirala Court) राहत नसल्याने त्यांच्या विरोधात शिराळा न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे. राज ठाकरे यांना 8 जूनपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण -

राज ठाकरेंच्या परप्रांतीयांविरोधातील भूमिकेमुळे कल्याणमध्ये २००८ रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये राज ठाकरेंवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. परंतु या अटकेनंतर महाराष्ट्रात मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. यामध्ये परळी आणि सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सांगलीतील शिराळा न्यायालयाकडून राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. जामीन मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी न्यायालयात हजेरी लावली नाही. सतत गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरेंवर कारवाई करण्यात येत आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती -

शिराळा न्यायालयाकडून राज ठाकरेंविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट मुंबई पोलिसांना प्राप्त झाले असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली आहे. तसेच याबाबत राज ठाकरेंना कळवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज ठाकरे वॉरंट रद्द करण्यासाठी स्वतः शिराळा न्यायालयात हजर राहू शकतात. अन्यथा मुंबई पोलीस या वॉरंटवरुन कारवाई करतील, असे संजय पांडे यांनी म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप