Ramdas Kadam
Ramdas Kadam Team Lokshahi
महाराष्ट्र

रामदास कदम यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक; बॅनरला मारल्या चपला

Published by : shamal ghanekar

हर्षल भदाणे पाटील | नवी मुंबई : रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा पनवेलमधील शिवसैनिकांनी चांगलाच समाचार घेतला. शिवसेना शाखा पनवेल या ठिकाणी रामदास कदम यांच्या पुतळयाचे दहन करून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीसुद्धा केली.

ज्या रामदास कदम यांना तब्बल दोन वेळा शिवसेनेने विधानपरिषद उमेदवारी दिली आणि विधान परिषदेतून पर्यावरण मंत्री पद दिले. रामदास कदम यांच्या मुलाला आमदार केले. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी पोटच्या पोरासारखी काळजी घेतली. त्या रामदास कदम यांनी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करणं.. ही हिम्मत दाखवणं. ही विकृती आहे हा सत्तेचा माज आहे असे शिवसैनिकांनी म्हंटले.

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध नोंदवण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत साहेब, सल्लागार शिरीष बुटाला, पनवेल उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम,विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, तालुका प्रमुख संदीप तांडेल, विश्वास पेटकर, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर संघटक शशीकांत डोंगरे, उपजिल्हा संघटीका कल्पना पाटील, विधानसभा संघटीका रेवती सकपाळ, शहप्रमुख प्रवीण जाधव, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी, महिला आघाडी च्या मीना सादरे, संचीता राणे, सानीका मोरे, रुपाली कवले, उज्वला गावडे, पदाधिकारी, युवासेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत, विधानसभा अधिकारी, पराग मोहिते तसेच शिवसेना, युवासेना व युवतीसेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ