Shivsena 
महाराष्ट्र

शिवसेना शहर प्रमुखास महिला शिवसैनिकांची मारहाण; जाणून घ्या प्रकरण काय?

Published by : left

भाईंदर शिवसेना (Shivsena) शहर प्रमुख पप्पू भिसे (Pappu Bhise) यांना महिला शिवसैनिकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिवसेनेच्या शाखेच्या बाहेर ही घटना घडली.दरम्यान या मारहाणीची चित्रफित देखील समाजमाध्यमावर चांगलीच व्हायरल झाली आहे. यामुळे शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

भाईंदरमध्ये आज शिवसेनेचा एक पक्षांतर्गत कार्यक्रम होता. त्यावेळी महिला शहर संघटक वैदेही परूळेकर यांच्याशी पप्पू भिसे (Pappu Bhise) यांचा त्यांचा वाद झाला. त्यानंतर परुळेकर आणि अन्य महिलांनी पप्पू भिसे यांना शाखेच्या बाहेर खेचत बेदम मारहाण केली.या मारहणीच्या घटनेचा व्हिडिओ शहरात सर्वत्र व्हायरल होत असून, जोरदार चर्चा देखील सुरू आहे.

या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात (bhayandar police station) पप्पू भिसे यांच्यासह अन्य एका व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर भिसे यांनी दिलेल्या जबाबानंतर वैदही परुळेकर यांच्यावरही मारहाणीचा गुन्हा दाखल (Police fir filed) करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा