Shiv Sena for deleting teaser  team lokshahi
महाराष्ट्र

शिवसेनेवर टीझर डिलीट करण्याची नामुष्की

मनसेच्या सभेचा व्हिडीओ टीझरमध्ये वापरल्याचा मनसेचा दावा

Published by : Shweta Chavan-Zagade

येत्या 14 मे रोजी बीकेसीमध्ये (bkc) शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena chief) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेचा दुसरा टीझर (Teaser) शिवसेनेकडून (Shiv Sena) प्रदर्शित केल्यानंतर आज शिवसेनेच्या अधिकृत ट्विट पेजवरून तिसरा टीझर शेअर केला होता, मात्र तासाभरात शिवसेनेकडून टीझर डिलीट करण्यात आला. दरम्यान मनसेच्या सभेचा व्हिडीओ शिवसेनेच्या टीझरमध्ये वापरल्याचा दावा मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला आहे.

यावेळी मनसे प्रवक्ता गजानन काळे यांनी, पाडव्याच्या सभेचे फोटो सुद्धा शिवसेना चोरत आहेत. यापूर्वी त्यांनी आमचे नगरसेवक चोरले होते, आता फोटो पण चोरत आहे. गर्दी जमावण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचे व्हिडोओ वापरता आहेत. तसेच राज ठाकरे यांच्यासभेचे व्हिडोओ वापरून टिझर बनवला आला आहे. शिवसेने त्यांचे नाव बदलून चोरसेना ठेवले पाहिजे, असा टोला मनसे प्रवक्ता गजानन काळे यांनी शिवसेनेवर लगावला आहे.

पहिल्या टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील अंश वापरण्यात आला आहे. तसंच साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या, प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला, यायलाच पाहिजे, असं आवाहनंही शिवसेनेनं टीझरमधून केलं आहे

'14 तारखेला माझी सभा आहे, मला माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझ्या मनात काही तुबलेलं नाहीय पण मनात अनेक काही गोष्टी आहेत त्या बोलणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. हल्ली थापा मारण्याची फार सवय आहे. अच्छे दिन येतील असं म्हटले होते, पण आता वाट बघतोय, अशा थापा चालणार नाहीत. कौतुकाची थाप मारणारे कमी आहेत बाकी थापा मारणारे जास्त आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस