महाराष्ट्र

शिवसेना नेत्यांचे काॅंग्रेस आमदारावर आरोप, मुख्यमंत्र्यांना लिहले पत्र

Published by : Lokshahi News

रुपेश होले (बारामती) : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बाॅम्बमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. आता पुरंदर तालुक्यातील शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी काॅंग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्यावर आरोप केले आहेत. शिवतारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात आरोप केलेत.

शिवतारे पत्रात म्हणतात "राज्यमंत्रीपदाच्या काळात मोठ्या मेहनतीतून मी पुरंदर, भोर आणि वेल्हा या तीन तालुक्यांना वरदान ठरणारे गुंजवणी धरण पूर्ण केले. मी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनीच्या कामाला सुरवात केली आहे. मात्र, या कामात सातत्याने अडथळे आणण्याचे काम कॉंग्रेसचे स्थानिक आमदार संजय जगताप यांच्याकडून केले जात आहे." याशिवाय "तोंडल येथे काम सुरु केल्यानंतर अधिकाऱ्यांना धमकावत काम बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते करावे असा त्यांचा आग्रह असल्याचे समजते." असही माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रात म्हंटले आहे. यामुळे महाविकास आघाडीत किमान स्थानिक पातळीवर तरी मतभेद असल्याचं दिसत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा