बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Shivsena) आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन केलं जाताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षावर काल रात्री महत्त्वाची बैठक पार पडली.
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह महत्त्वाच्या नेत्यांमध्ये ही बैठक पार पडली. बैठकीत तब्बल 2 तास चर्चा झाल्याची माहिती मिळत असून बावनकुळे, रवींद्र चव्हाण, उदय सामंतही उपस्थित होते. या बैठकीत मनपा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर जागावाटपात शिंदे काही जागांवर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. आज पुन्हा शिवसेनेची बैठक होणार असून शिवसेना नेत्यांची नंदनवनवर सकाळी 10 वाजता बैठक पार पडणार आहे. भाजपाशी चर्चा केल्यानंतर शिवेसेनेची ही बैठक असणार आहेत. या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
जागावाटपात शिंदे काही जागांवर ठाम
वर्षा निवासस्थानी काल झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा शिवसेनेची बैठक
नवनिर्वांचित नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आज सत्कार होणार