महाराष्ट्र

…तर शरद पवारांनी उजणी धरणच पुणे जिल्ह्यात वळवलं असतं, शिवसेना आमदाराची जोरदार टीका

Published by : Lokshahi News

उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावावर इंदापूर तालुक्यात वळवण्यास मान्यता मिळालेली आहे. या निर्णयामुळे आता धरणातील पाण्यावरून राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. दरम्यान या समस्येवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी तीव्र विरोध केला आहे. या विरोधासह त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी उजनी धरणातून सांडपाण्याच्या नावावर पाच टीएमसी पाणी वळवण्यास मान्यता मिळवून घेतलेली आहे. या निर्णयानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आलेली आहे. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी नेते माऊली हळणवर आणि दिपक भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांना जागृत केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराच्या दारासमोर हलगी नाद आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे.

दरम्यान आज सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्यास तीव्र विरोध केला. तसेच शरद पवारांवर टीका केली.

राज्यात ज्या ज्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले तेव्हा तेव्हा त्यांनी फक्त बारामती हाच विकास केलेला आहे. राज्यातला सगळा निधी बारामतीला न्यायचा आणि बारामती हे विकासाचं मॉडेल आहे. हे देशभर सांगायचं ही पवारांची पद्धत असल्याची जळजळीत टीकाहि केली. पवार राज्याचे नेते असून फक्त बारामतीचा विकास केल्याचा आरोप आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी केला.

उजनी धरणातून शरद पवार आणि बारामती एमआयडीसी बारामती शहराच्या पाणीपुरवठाला पाणी नेलं सिनार मास प्रकल्प ना पाणी नेलं एवढं पाणी देऊनही जर शरद पवारांना पाणी कमी पडतेय असं वाटत आहे. उजनी धरणच पुणे जिल्ह्यात वळवण्याची काय यंत्रणा असती तर ते धरण सुद्धा शरद पवारांनी त्यांच्या भागात नेलं असतं अशी जोरदार टीका आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द