थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हे पक्ष शिवशक्ती म्हणून एकत्र येवून निवडणूक लढवत आहे.
मुंबई मधील ६ प्रभागामध्ये शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते अपक्ष निवडणूक लढवत असून ते काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या एका प्रभागामध्ये आमचे अधिकृत उमेदवार खालीलप्रमाणे आहेत.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उध्दवजी ठाकरेसाहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांना आम्ही आमच्या अधिकृत उमेदवारांच्या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आव्हान करीत आहोत.
बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरेसेना–मनसेची शिवशक्ती आघाडी सक्रिय.
मुंबईतील ६ प्रभागांसाठी अधिकृत उमेदवारांची घोषणा.
अपक्ष उमेदवारांमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मतदारांना अधिकृत उमेदवारांना मतदानाचे आवाहन.