थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP - Shivsena) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठका, जागावाटपाबाबत चर्चा करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भाजप-शिवसेनेत काही जागांवर अद्यापही रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत होती.
याच पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेची जागा वाटपा संदर्भात पुन्हा बैठक झाली. जवळपास सहा तास महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. यामध्ये राहुल शेवाळे, अमित साटम उपस्थित होते.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत भाजप-शिवसेनेचं अखेर ठरलं असून शिवसेना 90 जागांवर लढणार असून उर्वरित 137 जागांवर भाजप निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत शिवसेना- भाजपमधील तिढा अखेर सुटल्याचे पाहायला मिळत आहे.
Summery
मुंबईत भाजप-शिवसेनेचं अखेर ठरलं
शिवसेना 90 जागांवर लढणार
उर्वरित 137 जागांवर भाजप निवडणूक लढणार