महाराष्ट्र

Satara District Bank Election Results: …तर शिवसेना पुढील सर्व निवडणूका स्वबळावर लढणार – शंभूराज देसाई

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप, सातारा | माझ्या प्रतिस्पर्ध्यानी गेले दोन महीने सणासुदीच्या काळात सुध्दा मतदार बाहेर ठेवले याला परिवर्तन म्हणतात का ?महाविकास आघाडी आपला साताऱ्यात आघाडी धर्म पाळत नसेल तर शिवसेना येथून पुढील सर्व निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचा इशारा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिला. देसाई यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शंभूराज देसाई म्हणाले.. निवडणूक म्हटलं तर जय पराजय होतोच तो मी स्वीकारलाय.परंतु 102 मताच्या निवडणुकीला परिवर्तन अस म्हणता येत नाही. परिवर्तन हे मी मागील 4 महिन्यापुर्वी दाखवल आहे. माझ्या प्रतिस्पर्ध्यानी गेले दोन महीने सणासुदीच्या काळात सुध्दा मतदार बाहेर ठेवले याला परिवर्तन म्हणतात का ? माझ्या पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांना मी सांगणार आहे, जर महाविकास आघाडी आपला साताऱ्यात आघाडी धर्म पाळत नसेल तर शिवसेना येथून पुढील सर्व निवडणूका स्वबळावर लढणार आहे.

एसटी संपावर लवकर मार्ग निघेल

परिवहन मंत्री एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत.. विलिनीकरण हा प्रश्न मोठा आहे तो लवकर सुटणार नाही राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे परंतू त्यावर मध्य काढण्याचा प्रयत्न परिवर्तन मंत्री करत आहेत. यातुन नक्कीच लवकर मार्ग निघेल असे देसाई म्हणाले.

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ