थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Eknath Shinde) आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. 29 महापालिकांची निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली असून आज निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे.
आजपासून उमेदवारांच्या प्रचार फेरी, सभांना सुरुवात होईल. अनेक ठिकाणी स्थानिक नेते आणि प्रमुख नेत्यांच्या सभा होतील. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात शिवसेनेच्या प्रचार मोहिमेचा आज शुभारंभ होणार असून उदय सामंत यांच्या उपस्थितीत या प्रचाराला सुरुवात होणार आहे. यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 9 जानेवारीला भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे.
Summary
पुण्यात शिवसेनेच्या प्रचार मोहिमेचा आज शुभारंभ
उदय सामंतांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात होणार
एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 9 जानेवारीला भव्य रॅलीचं आयोजन