महाराष्ट्र

साताऱ्यात युवक पडला दरीत; आ. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमची धाव, 15 तासांच्या अथक प्रयत्नानंतर केले रेस्क्यू

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप, सातारा | सातारा शहरालगत असणाऱ्या यवतेश्वर घाटात मंगळवारी युवक दरीत पडल्याची घटना घडली होती. सुशांत बोराटे असे या तरूणाचे नाव आहे. या युवकाला आता 15 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेस्क्यू करण्यात यश आले आहे. आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या रेस्क्यू टीमने ही कामगिरी बजावली.

सातारा शहरालगत असणाऱ्या यवतेश्वर घाटात काल चार वाजण्याच्या सुमारास सुशांत बोराटे हा युवक दरीत पडला होता. आज सकाळी मॉर्निंग वॉकला जाणा-या नागरीकांना रस्त्याच्या कडेला दुचाकी पडलेली दिसली. यावेळी नागरीकांना थोडा संशय आल्यामुळे त्यांनी दरीच्या दिशेने डोकावुन पाहीलं असता युवकांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. यावेळी नागरीकांनी आमदार शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला फोन केला.

शिवेंद्रराजे रेस्क्यू टिम या ठिकाणी दाखल झाली सुशांत बोराटेला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते दरीत उतरले. अत्यंत अथक प्रयत्नानंतर सुशांत बोराटेला वाचवण्यात यश आले आहे. पंधरा तासांहून अधिक काळ हा युवक दरीत पडलेल्या अवस्थेत दिसुन आल्यानंतर रेस्क्यु टिमने सुशांत बोराटे यास बाहेर काढुन त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. संबंधित युवक हा दरीत नेमका कसा पडला याचा शोध पोलीस घेत आहेत मात्र वेळीच मदत मिळाल्यामुळे या तरुणाचे प्राण आमदार शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kokilaben Ambani : मुकेश अंबानी यांच्या मातोश्रींची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

Latest Marathi News Update live : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटला; मानाच्या गणपतीची सकाळी 8 वाजता मिरवणुक होणार सुरू

Nagpur Marbat : मारबत मिरवणुकीसाठी नागपूर पोलिसांचा कडक बंदोबस्त; ड्रोन कॅमेऱ्यातून नजर

Monorail : मोनोरेल पुन्हा झाली ओव्हरलोड; 50 प्रवाशांना उतरवलं खाली