महाराष्ट्र

शिवेंद्रराजे भोसलेंच्या वाढदिवसाचे होर्डिंग कोसळून महिला जखमी

महिला जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सातारा : आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी मोठं-मोठे फ्लेक्स लावत बॅनरबाजी करत असतात. परंतु, यामुळे कधी-कधी दुर्घटना घडत असतात. साताऱ्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले होर्डिंग कोसळून एक महिला जखमी झाली आहे.

साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. पोवई नाक्यावर पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या बूथला हे होर्डिंग बांधण्यात आले होते. आज दुपारी अचानक ते कोसळलं. यामध्ये एक महिला जखमी झाली आहे. या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवेंद्रराजेंनीही काही वेळ गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी अडीच तास कार्यक्रमाची मजा घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणावर तरुण उपस्थित होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Bhagwangad : Dasara Melava : भगवानगडावरील दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे फोटो

Manoj Jarange Patil : दसरा मेळाव्याआधीच मनोज जरांगे पाटील यांचे, आव्हान म्हणाले...

PM Narendra Modi : RSSच्या शताब्दीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Latest Marathi News Update live : राज्यात आज 5 दसरा मेळावे होणार