महाराष्ट्र

पाच वर्षांच्या कामाचे अपयश लुंगीत लपवण्याचा प्रयत्न;शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर जळजळीत टीका

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप, सातारा | साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुष्पा चित्रपटातील नायकाप्रमाणे लुंगी घालून फोटो शुट केले होते. या फोटो शुटवर आता टीका होत आहे. पाच वर्षांच्या कामाचे अपयश लुंगीमध्ये लपवण्याचा प्रयत्न उदयनराजे करत असल्याची खोचक टीका आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर केली. या टीकेला आता ते काय प्रतिउत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पुष्पा चित्रपटाची संपुर्ण देशभरात आहे. त्यात आता या सिनेमाने खासदार उदयनराजे भोसले यांनाही भूरळ पाडली. त्यामुळे या सिनेमातील नायकाप्रमाणे खासदार उदयनराजे यांनी पोवई नाक्यावरील सेल्फी पॉईंट येथे लुंगी घालून फोटो सेशन केले. या फोटो सेशनवर आता आमदार शिवेंद्रराजे यांनी टीका केली आहे.

मी उभारलेल्या कामाच्या प्रेमात उदयनराजे पडले आहेत हे चांगले आहे.उदयनराजेंच्या कामाच्या प्रेमात कोण पडेल अशी काम त्यांच्याकडे नाहीत.आपण केलेल्या पाच वर्षांच्या कामाचे अपयश हे लुंगी मध्ये लपवण्याचा प्रयत्न उदयनराजे करत असल्याची खरमरीत टीका शिवेंद्रराजे यांनी केली.

सातारकरांनी त्यांच्याकडे मनोरंजन म्हणून बघावे.राजकीय लोकांना देखील आता फॅन्सी ड्रेस पार्टी करावी लागत आहे हा गंमतीचा भाग असल्याचे सांगत उदयनजेंच्या लुंगी घालून केलेल्या फोटो सेशनवर शिवेंद्रराजेंनी चांगलीच टीका केली आहे..

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा