संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातलेले असताना भीमाशंकर मंदिरातील शिवलिंग पाण्याखाली गेले आहे. पुण्यातील, जुन्नर, खेड, आंबेगाव, मुळशी या तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. अनेक भागात नद्यांना पुर आला आहे. त्यातच भीमाशंकर परिसरात गेल्या अनेक तासांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे.
काल आणि आज भीमाशंकर परिसरात जोरदार पाऊस पडल्याने मंदिराच्या बाजुच्या डोंगरातुन पुराचा लोट मंदिरात आला आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरले असून शिवलिंग पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे.