Deepali sayyed  
महाराष्ट्र

'ही बाळासाहेबांची शिवसेना, इथे जो नडला त्याला फोडला'

Published by : left

राणा दाम्पत्यांवरील कारवाईनंतर आता शिवसेनेवर चहुबाजुंनी टीका होत आहे. या टीकेवर आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, आणि इथे जो नडला त्याला फोडला, अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दिपाली भोसले सय्यद खालापूर तालुक्यात पत्रकार पऱिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यांच्या नाटकानंतर, किरीट सोमय्याचे खेळ आणि मशिदीवरील भोंग्यांचा विषय छेडला. यावेळी राणा दाम्पत्य तुरुंगात गेल्यानंतर त्यांना फाईव्ह स्टार हॉटेलची सुविधा हवी असल्यासारखी तऱ्हा झाली आहे. त्यांना घुटमळतंय, पोलीस त्रास देताहेत, अरे बाबांनो... ते फाईव्ह स्टार हॉटेल नाही तर तुम्ही न्यायालयीन कोठडीत आहेत, हे सांगण्याची आता वेळ आली आहे, असे दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत.

तसेच किरीट सोमय्या हा जरा काही झालं की दिल्ली, जरा काही झालं की मोदी यामध्ये गुरफटलेले आहेत, यांना लोकशाही माहीतच नाही का ? आपल्या तक्रारी राज्य सरकारपर्यंत विचार करून आपणास न्याय न मिळाल्यास दिल्ली वाऱ्या करा... मात्र जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी भाजपची ही माकडे उड्या मारत असल्याचीही टीका त्यांनी केली.

शिवसैनिकांवर केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारले असता, ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आहे, आणि इथे जो नडला त्याला फोडला.हाच मार्ग आणि हीच शिकवण आमची राहणार आहे. मशिदीच्या भोंग्यांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, राज्य सरकार न्ययालयाचे आदेश मानत आहेत, या माकडांच्या घराचे कायदे येथे चालणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा