थोडक्यात
समृद्धी महामार्गावर धक्कादायक प्रकार
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खिळेच खिळे
महामार्गावर खिळे असल्याने 3 ते 4 गाड्या पंचर
( Samruddhi Mahamarg ) समृद्धी महामार्गावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खिळेच खिळे असल्याचे पाहायला मिळत आहे. महामार्गावर खिळे असल्याने 3 ते 4 गाड्या पंचर झाल्याची माहिती देखील मिळत आहे.
यावर डॉ. शिवलक्ष्मी आईसाहेब यांनी एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, 'नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर मोठा कट रचून जीवीतहानीचा प्रयत्न.100 पेक्षा जास्त खिळे रस्त्यावर ठोकून समाजकंटकांनी अनेक जीवांशी खेळण्याचा प्रयत्न केला.'
'महामार्ग पोलीस व प्रशासन मात्र अरेरावी करत ऊलट प्रवाशांवर आवाज चढवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत.' असे डॉ. शिवलक्ष्मी आईसाहेब यांनी म्हटले आहे.