crime Team Lokshahi
महाराष्ट्र

Crime : जालन्यात डुकरांच्या वाटणीतून तरुणावर गोळीबार

परतूर तालुक्यातील हातडी येथील घटना, गोळीबारात तरुण जखमी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

रवी जयस्वाल | जालना : बुलेटवरून आलेल्या 3 अज्ञातांनी गावठी पिस्तूलातून तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जीवन जाधव असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील हातडी येथे आज सकाळी ही घटना घडली. डुकराच्या वाटणीवरून गोळीबार झाल्याचा संशय आहे.

हातडी येथील घनसावंगी तालुक्यातील कंडारी परतुर येथे जीवन जाधवकडे पाळलेली डुकरे आहेत. आज सकाळी जीवन जाधव हा डुकरांची देखभाल करण्यासाठी हातडीत आला होता. यावेळी बुलेटवरून आलेल्या अज्ञात 3 इसमांनी त्याच्यावर गावठी पिस्तूलातून गोळ्या झाडल्या. या घटनेत जीवन जाधव डोक्याला गोळ्या लागल्याने गंभीर जखमी असून, पोलिसांनी तातडीने त्याला उपचारासाठी जालना येथे हलविले आहे.

या घटनेनंतर परतुर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमींना मदतकार्य केलं. बुलेटवरून आलेले हल्लेखोर हे तिघेजण असून ते गोळ्या झाडून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा